वैजापूर, (प्रतिनिधी): वैजापूर - गंगापूर महामार्ग वरील विरगाव फाटा येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत दीड लाखाचा गांजा जप्त केला.
दादासाहेब मोईन (रा चिंचडगाव, ता. वैजापूर) जिल्हा छत्रपती संभाजी नगर असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विरगाव फाटा
येथे गुरुवारी एकजण दुचाकीने गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती छञपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून सायंकाळच्या सुमारास दादासाहेब मोईन याला मोटारसायकल व गांजा असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, स. पो. नि. पवन इंगळे, पो. हे विष्णू गायकवाड, अंगद तिडके, अनिल काळे, महेश बिरुटे यांनी केली आरोपी विरुद्ध विरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विरगाव पोलीस करत आहे.











